हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सध्या जगभरात मंदीसदृश वातावरण आहे, अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आता नोकरदार वर्गाचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. कारण या वर्गातील करदात्यांना या अर्थसंकल्पातून इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळण्याची अपेक्षा आहे.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये भरलय गेलेल्या एकूण ITR पैकी सुमारे 50 टक्के पगारदार वर्गाकडून भरला गेला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2023) सरकारकडून त्यांच्यासाठी काही विशेष घोषणा केली जाण्याची आशा अशा करदात्यांना लागून राहिली आहे. मध्यमवर्गावरील दबाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही पावले उचलली जातील, असे सूतोवाच अर्थमंत्र्यांनी अलीकडेच दिला होते. चला तर मग नोकरदार वर्गाला यंदाच्या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेउयात…
80C अंतर्गत सवलतीचे लिमिट
सध्या करदात्यांना इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांची सवलत मिळते. आता ही मर्यादा वाढवण्याची मागणी करदात्यांकडून केली जाते आहे. जर अर्थसंकल्पात सरकारने याबाबत काही निर्णय घेतला तर यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, PPF, ELSS, NSC, NPS, Bank FD सारखे बचतीचे पर्याय या अंतर्गत येतात. Budget 2023
टॅक्स लिमिटमध्ये वाढ
सध्याच्या वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्चात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, करदात्यांना नवीन टॅक्स सिस्टीम अंतर्गत 2.5 लाख रुपयांच्या इन्कम टॅक्स सवलतीची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. हे जाणून घ्या कि, सध्या 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या पगारावर 5% तर 5 ते 7.5 लाखांवर 20% टॅक्स भरावा लागत आहे. Budget 2023
स्टॅण्डर्ड डीडक्शन
इन्कम टॅक्सच्या कलम 16 (ia) अंतर्गत, नोकरदार वर्गाला दरवर्षी 50,000 रुपयांच्या स्टॅण्डर्ड डीडक्शन लिमिटमध्ये सूट मिळते. आता यामध्येही वाढ होण्याची अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे. त्यांना आशा आहे की, सरकारकडून स्टॅण्डर्ड डीडक्शनचे लिमिट 50,000 रुपयांवरून 75,000 रुपये केले जाईल. Budget 2023
हेल्थ इन्शुरन्स क्लेम
सध्या कलम 80D अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स क्लेम करण्याची सध्याची मर्यादा 25,000 रुपये आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार कडून ती देखील वाढवून 50,000 रुपये करेल अशी अपेक्षा केली जाते आहे. याशिवाय, वृद्धांसाठी ही सवलतीची मर्यादा 50,000 रुपयांवरून 75,000 रुपये केली जाऊ शकते.
पेन्शन प्लॅनमधील गुंतवणूक
नोकरदार लोकांना आशा आहे की, सरकारकडून पेन्शन प्लॅनमधील गुंतवणूकीची कर सवलतीची मर्यादा देखील वाढवण्यात येईल. असे म्हटले जात आहे की, इन्कम टॅक्स कलम 80CCD (1B) अंतर्गत सरकार सवलतीची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करू शकते. Budget 2023
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???