गुलमंडी ते पैठणगेट वाहन बंदीचा प्रयोग

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठण गेट गुलमंडी पर्यंतचा रस्ता काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पीपल फॉर उपक्रम राबविण्यात येणार असून मंगळवारी या भागातील व्यापार आन सोबत चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर दिल्लीतील ‘चांदणी चौका’ प्रमाणे पायी फिरून खरेदी करता येणार आहे.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे देशभरातील स्मार्ट शहरांसाठी पीपल फॉर स्ट्रीट योजना आणली. या योजनेत औरंगाबाद स्मार्ट सिटी ने भाग घेतला आहे. स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये पैठणगेट येथील व्यापाऱ्यांना संकल्पना समजावून सांगितली. व्यापाऱ्यांनीही या योजनेला पाठिंबा दर्शवला. तसेच कॅनॉट प्लेस येथील व्यापाऱ्यांनी होकार दर्शवला. प्रत्यक्षात काम सुरू होण्यास स्मार्ट सिटी कडून विलंब झाला. काल सायंकाळी पुन्हा स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांनी पैठणगेट येथील व्यापाऱ्यांनी सोबत चर्चा केली. व्यापाऱ्यांनी हॉकर्सचा सर्वाधिक त्रास असल्याचे नमूद केले तसेच पार्किंगला शिस्त लावण्याची विनंती केली.

पीपल फॉर स्ट्रीट मध्ये वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल. वाहतूक कधीपासून बंद होणार हे लवकरच घोषित केले जाणार आहे. या रस्त्यांवर नागरिकांना पायी फिरून खरेदी करता येईल. आकर्षक विद्युत रोषणाई, ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था अशा अनेक सोयी-सुविधा राहतील. या वेळी प्रकल्पप्रमुख स्नेहा मोहन, तिवारी आदींची उपस्थिती होती.