हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 14 एप्रिल ते दि. 16 एप्रिल दरम्यान, खारघर ते इन्सुली (सांतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग 66. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य मार्ग वरून 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांची वाहतूक (अवजड) बंद राहणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 16 एप्रिलला महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्काराने सन्मान होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने जवळपास 15 ते 20 लाख लोक मुंबईला जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सदर मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतचा शासनाचे सहसचिव आदेश राजेंद्र होळकर यांच्या सहीनिशी काढण्यात आला आहे.
शासन आदेशात म्हंटल्याप्रमाणे, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शनिवारी म्हणजेच १६ एप्रिलला महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील खारघर येथे हा गौरव सोहळा खारघर होणार असून सदर कार्यक्रमाकरीता पुणे, नाशिक, रायगड रत्नागिरी मुंबई धुळे सातारा, जळगाव नंदुरबार अशा जिल्ह्यातून तसेच बाहेरीत राज्यातून जवळपास 15 ते 20 लाख लोक खाजगी वाहनाने तसेच रेल्वे आणि एसटी बसने येणार आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर चौपदरीकरणाचे कामकाज चालू असल्यामुळे सदर महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बोटलनेक पॉईंट तयार झालेले आहेत. त्यातच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे तसेच 15 आणि 16 एप्रिलला शनिवार- रविवार असल्यामुळे सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे नागरिक व पर्यटक मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून या मार्गावरून प्रवास करणार आहेत. अशा वेळेस सदर मार्गावरून अवजड वाहतुक सुरु राहील्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतुदीचा वापर करून महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे खारघर ते इन्सुली (सावंतवाडी ) या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य मार्ग वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रक मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांची वाहतुकीबाबत पुढीलप्रमाणे आदेश देत आहेत. मात्र दूध, पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर लिकीड मेडिकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इ जीवनावश्यक वस्तुची व्हँतुक करणाऱ्या वाहनांना हे आदेश लागू होणार नाहीत असं शासनाने म्हंटल आहे. तसेच उपरोक्त महामार्ग राज्य मार्ग च्या रस्तारेदीकरण / रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य माल इत्यादी ने-आण करणान्या वाहनांना सुद्धा बंदी लागू राहणार नाही .