Wednesday, February 1, 2023

परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे स्वतः अडचणीत सापडले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील एका व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे . एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी व इतर सहकारी साथीदार व संबंधित पोलीस अधिकारी यांचे विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 299/ 21, कलम 387,388,389, 403,409,420,423,464,465,467,468,471,120(b),166,167,177,181,182,193,195,203,211,209,210,347,109,110,111,113 भा .द .वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील 2 आरोपी अटक करण्यात आले आहेत.