फेक इमेजेस आणि फेक व्हिडिओंवर बंदी घालण्यासाठी गुगलने लाँच केले नवीन फॅक्ट चेक टूल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोक सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ आणि फेक इमेजेस बद्दल देखील चिंतित आहेत. मात्र ,फेक इमेजेस आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचा ट्रेंड हा काही नवीन नाही. अशी प्रकरणे यापूर्वीही आलेली आहेत. असे फेक इमेजेस आणि व्हिडिओज ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी आता गुगल सर्च इंजनने एक खास टूल आणले आहे. या विशेष टूल मध्ये, फेक इमेजेसना ओळखण्यासाठी Google ने एक नवीन फॅक्ट चेक मार्कर जोडला आहे, जो युझरने सर्च केलेल्या इमेज सोबत दिसेल.

हे टूल फेक इमेजला ओळखून लेबलिंग करेल
गूगलचे हे टूल फेक इमेजेस ओळखून लेबलिंग करेल. हे लेबलिंग केलेले इमेजेस आणि व्हिडिओच्या वेब पेजच्या खाली दिसतील. इतकेच नव्हे तर या इमेजेसच्या स्त्रोताशी संबंधित सगळी माहिती या फॅक्ट चेकमध्ये कळेल. गुगल प्रॉडक्ट मॅनेजर हॅरिस कोहेन म्हणाले की,’ इमेजेस आणि व्हिडीओज हे जगभरातील माहितीचे महत्त्वपूर्ण स्त्रोत मानले जातात. अशा परिस्थितीत चुकीच्या व्हिज्युअल आणि प्रतिमांमुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.

दररोज 1.1 कोटीहून जास्त वेळा होते तपासणी
गुगलने म्हटले आहे की, या सर्च रिझल्टची तपासणी दररोज 1.1 कोटीहून अधिक वेळा केली जाते. गुगलवर इमेजेसचा शोध घेतल्यानंतर, सापडलेल्या इमेजच्या खाली फॅक्ट चेक हे लेबल दिसेल. हे लेबल फोटोच्या खाली थंबनेल म्हणून दिसेल, म्हणजेच जेव्हा आपण हे फोटो मोठे कराल तेव्हा आपल्याला वेब पेजच्या खाली एक फॅक्ट चेक लेबल दिसेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment