हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. यानंतर विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता समीर वानखेडे यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिने ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. तसेच “सत्यमेव जयते,” असे म्हंटले आहे.
क्रांती रेडकर हिने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता, तेव्हा तुम्ही बुडू शकता. पण जर तुम्ही सर्वात शक्तिशाली असाल तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्याला माहिती आहे. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,” असे ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
When you swim against the tide , it may drown you, but if the almighty is with you , no tide this is world is big enough to drown you. Because , only HE 👆🏻knows the truth 🙏🙏🙏 good morning . SATYAMEV JAYATE.
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) October 25, 2021
आर्यन खान अटक प्रकरणात आता तब्बल 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी त्यांची पत्नी क्रांती रेडकर हिने महत्वाचे ट्विट केले आहे. त्यामध्ये तिने शेवटी सत्याचाच विजय होईल, असे म्हंटले आहे.