हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी दुपारी पाकिस्तानच्या लाहोर शहरातून कराचीला जाणारे एक प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या विमानामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद असे एकूण ९९ लोक होते. विमानतळावर पोहोचण्याच्या अवघ्या १ मिनिट आधी हे विमान कराचीजवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा अबिद हिचे निधन झाल्याचे वृत्त आज समोर आले आहे.
लाहोरमध्ये एका कपड्याच्या ब्रॅंडसाठी शूटिंग करीत असताना अचानक काकांच्या निधनाची बातमी आल्याने ती तातडीने लाहोरहून कराचीला निघाली होती. मात्र या दुर्घटनेमध्ये तिचे निधन झाले. प्राथमिक माहितीत काही जण जखमी असल्याची बातमी होती मात्र प्रसिद्ध टीव्ही अँकर आणि पत्रकार झैन खान यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून ही बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. यावर्षीच्या जानेवारी मध्ये तिने चौधरी सिनेमातून चित्रपटात पदार्पण केले होते. ४ थ्या हम स्टाईल अवॉर्ड मध्ये तिला उत्कृष्ट महिला मॉडेल हा अवॉर्ड मिळाला होता. तिची उंची आणि सावळा रंग यासाठी ती प्रसिद्ध होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला होता.
It has been confirmed that the Model & Actress Zara Abid hasn’t survived the #PK8303 #PIA Plane Crash. Such tragic news! Heartfelt Condolences to her family and friends.#PIACrash #ZaraAbid #planecrash pic.twitter.com/cj2In4gccq
— Zain Khan (@ZKhanOfficial) May 22, 2020
दरम्यान जिना गार्डनच्या मॉडेल कॉलनी परिसरात हे विमान कोसळले होते. विमान कोसळल्यामुळे परिसरातील गाड्यांचे आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत सर्वाना दुःख झाले असून झाराच्या निधनाने तिच्या फॅन्समध्ये शोककळा पसरली आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर झाराने कमी वयात चांगले नाव निर्माण केले होते. ती केवळ २८ वर्षाची होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.