हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह (Nishi Singh) यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. निशी (Nishi Singh) यांना मे महिन्यात पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ही खालवत गेली.
यानंतर त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांना घशाचा गंभीर संसर्ग झाला. यामुळे त्यांना काहीही खाता येत नव्हते. त्या फक्त द्रवपदार्थ खाऊ शकत होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली.अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे 16 सप्टेंबरला निशी सिंह (Nishi Singh) यांनी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता अशी माहिती निशी सिंह यांचे पती, लेखक आणि अभिनेते संजय सिंह भादली यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/sanjay.bhadli.3/posts/pfbid0HA9dNTLk69WkEG54A4LCzHTFUpTCKrg3bi4EJ51pwjgRNZes5G3KyYDusyDjy9y1l
निशी सिंह (Nishi Singh) या गेल्या कित्येक वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. त्यांनी हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यासारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांसोबत चित्रपटातही काम केले आहे. ‘कुबूल है’ या मालिकेत निशी सिंह यांनी हसिना बीवीची भूमिका साकारली होती. तसेच मान्सून वेडिंग या चित्रपटातही निशी सिंह यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या माघारी पती, लेखक-अभिनेते संजय सिंह भादली आणि दोन मुले असा परिवार आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!