Tuesday, October 4, 2022

Buy now

याला म्हणतात जबरा फॅन!! योगींचें मंदिरचं बनवलं; रोज करतो पूजा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणी लोकांना चाहत्यांची कमी नसते. आपल्या लाडक्या नेत्यासाठी काहीही करण्यासाठी काही कार्यकर्ते तयार असतात. साहेबांचा आदेश, साहेबांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असं तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. पण उत्तरप्रदेशात तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका जबऱ्या फॅन ने थेट त्यांचे मंदिरच बांधले आहे. येव्हडच नव्हे तर तो रोज सकाळ- संध्याकाळ मंदिरात येऊन योगीची पूजाही करतो .

योगी आदित्यनाथ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर मौर्य यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर रामजन्मभूमीपासून सुमारे 25 किमी अंतरावर भरत कुंडजवळ कल्याण भदरसा गावातील मौर्य का पूर्वामध्ये बांधले आहे. मंदिरात योगीची धनुर्धारी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची ५ फूट ४ इंच आहे. सकाळ- संध्याकाळ प्रभाकर मौर्य या मंदिरात येऊन आरती म्हणतात.

प्रभाकर मौर्य हे योगींचें कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा त्यांचा सन्मान केला आहे. योगींच्या मंदिराबाबत जो काही खर्च झाला ते सर्व त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून मिळवलेल्या कमाईतून केलेली आहे. प्रभाकर मौर्य यांनी युट्युब वर योगींच्या समर्थनार्थ शेकडो गाणी गायली आहेत. सध्या देशभर या मंदिराची चर्चा सुरु आहे.

Related Articles