Saturday, March 25, 2023

पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्यूबर ‘जीतू-जान’ याला अटक

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – प्रसिद्ध युट्यूबर जीतू-जान याला आपल्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली भांडुप पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जितेंद्रची पत्नी कोमल अग्रवाल हिने काही दिवसांपूर्वी घरात पंख्याला लटकून गळफास घेतला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर जितेंद्रला अटक करण्यात आली असे भांडुप पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कोमलने आत्महत्या केल्यानंतर तिच्या मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली होती. मात्र कोमलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी जितेंद्रच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे त्याच्या विरोधात भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जितेंद्रच्या विरोधात भादवी कलम 304, 323, 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जितेंद्रनेच आपली मुलगी कोमलची हत्या केल्याचा आरोप अग्रवाल कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. कोमल आणि जितेंद्र यांच्यामध्ये खुप वाद होते. त्याने याच वादातून पत्नी कोमलला मारहाणदेखील केली होती. असा जबाब कोमलच्या आई आणि बहिणीकडून नोंदवण्यात आला आहे. जितेंद्र हा एक प्रसिद्ध युट्यूबर असून तो जीतू जान नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे युट्यूबर 284K पेक्षा जास्त सब्सक्रायबर आहेत.