हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपटातील अभिनेत्रींचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज पाहून चाहतेही घायाळ होतात. आपल्या अभिनय व अंदाजाने ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे हि आता पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या इंट्राग्रामवर तिचा एक फोटो व्हायरल झाला असून तिचा त्यातील अवतार पाहून अनेकांकडून कमेंट्स केल्या जात आहेत.
https://www.instagram.com/p/CcPFqf6Ku6z/?utm_source=ig_web_copy_link
मराठमोळी अभिनेत्री असलेल्या राधिका आपटे हि आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती अधून मधून आपले फोटोही इंट्राग्रामच्या माध्यमातून शेअर करते. हंटर चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली राधिका हि नेहमीच वेगवेगळ्या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तिने नुकताच एक वेगळा लूक इन्स्टाग्रामवर शेअर केल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
राधिकाचा इन्ट्रावर सध्या चर्चेत असलेला लुक हा 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘पार्च्ड’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटांमध्ये तिने लज्जोची भूमिका साकारली होती. शिवाय या चित्रपटात तिने अनेक बोल्ड अशा पद्धतीचे सीन्सही दिले होते. त्यामुळे त्यावेळी ती चांगलीच चर्चेत आले होती.
राधिकाने आपल्या विचित्र अंदाजातील शेअर केलेल्या फोटोला “स्टेट ऑफ माईंड” असे कॅप्शननी दिले आहे. मळलेले कपडे, विस्कटलेले केस, गळ्यावर पारंपरिक गोंदण, अशा अवस्थेतील राधिका आपटेचा विचित्र असा लूक सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राधिकाच्या विचित्र अंदाजात या फोटोवरून तिच्यावर अनेकांकडून कमेंट्सही केल्या जात आहेत. यामध्ये एका नेटकऱ्याने तर तिला गाण्याच्या ओळीतून कमेंट केली आहेत. “क्या से क्या हो गये देखते देखते…”,असे म्हंटले आहे.
राधिका आपटे हिच्याबद्दल सांगायचे झाले तर राधिका ही मूळची पुण्याची आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपट केले आहेत. तिने मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या मात्र तिच्या जुन्या फोटोवरून नेटकऱ्यांकडून मात्र अनेक प्रकारच्या कमेंट्स करून तिला ट्रोलही केले जात आहे.