पोटसुळ उठल्यामुळे नैराश्येतून विरोधकांकडून अशी वक्तव्य; जयदीप शिंदे यांचे प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधकांच्या लक्षात आले आहे की यावेळेस आपले डिपॉझिटही जप्त होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये पोटसुळ उठला आहे. नैराश्याच्या भरात विरोधक अशी वक्तव्य करत आहेत. उमेदवार कोठेही मतदाराला घेऊन जात नाही, असे प्रत्युत्तर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जयदीप शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला दिले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून मतदानावेळी मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या आरोपानंतर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जयदीप शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी शिंदे म्हणाले की, विरोधकांना 50 चा आकडाही पार करता येणार नाही एवढी खात्री आहे. विरोधकांच्या लक्षात आला आहे की डिपॉझिटही जप्त होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये पोटसुळ उठला आहे.

https://www.facebook.com/watch/?v=189517443915527&mibextid=Nif5oz

संदीप पवार काय म्हणाले होते?

मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार हे मतदान प्रक्रियेमध्ये आत जाण्याचा प्रयत्न करतात आहेत. मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता त्यांची असली तरी त्यांनी कोणत्या भ्रमात राहू नये त्यांनी आत जाऊन हस्तक्षेप केला तर आम्हाला त्यावर आक्षेप घ्यावे लागतील, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी दिला आहे.