हिंगोली (रवींद्र पवार) । farmer : राबराब शेतात राबून गावठी कांदा केला. त्यानंतर याच कांद्याला बाजारभाव नसल्याने पुढे चांगले बाजारभाव मिळतील या आशेने उमरा येथील शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिने कांदा तळहाताच्या फोडाप्रमाणे ठेवला. पण आता हाच गावठी कांदा व्यापार्यांच्या दृष्टीने कवडी मोल झाला आहे. नवीन गावठी कांदा व्यापारी घेत असल्याने त्यामुळे संतप्त झालेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा येथील सचिन गोविंदराव बोंगाणे या शेतकऱ्यावर कांदा जनावरांपुढे टाकून देण्याची वेळ आली आहे. farmer
सचिन बोंगाणे हे आपल्या शेतात दरवर्षी गावठी कांद्याची लागवड करत असतात. त्यामुळे कांद्याचेही चांगले पैसे होत असतात. पण या वर्षीही कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून त्यांनी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी कांद्याची लागवड केली. तीन ते चार महिन्यांनी हा कांदा काढला असता त्यावेळी बाजारभाव नव्हते म्हणून बोंगाणे यांनी सर्व कांदा काढून शेतात मध्ये साठविला व तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला पण आता कांद्याला मोड येऊन टो खराब होऊ लागल्याने त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेण्याचे ठरविले आणि त्यानुसार पिकप मध्ये कांद्याच्या गोनीही भरल्या व विक्रीसाठी बाजार मध्ये नेला. farmer
पण कांदा पाहून व्यापारी म्हणाले की हा गावठी कांदा आहे. त्यामुळे त्याला बाजारभाव हि नाही. तो विक्रीसाठी पुन्हा आणू नका असे म्हणताच शेतकरी हवालदिल झाले. राहिलेल्या कांद्याचे नेमकी करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे आला. शेवटी हा सर्व कांदा जनावरांनपुढे टाकून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तळहाताच्या फोडाप्रमाणे साठविलेल्या कांद्याची देखभाल केली. खत, औषध, फवारणी यांचाही खर्च वसूल झाला नाही. पण आता व्यापारीच जर कवडीमोल भावाने कांदा खरेदी करू लागले तर त्यापेक्षा जनावरांना टाकून दिलेला चांगला राहील असे सचिन बोंगाणे यांनी सांगितले आहे. सध्या कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नसल्याने त्यामुळे सर्व सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. farmer
हे पण वाचा :
ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त
वर्ध्यात चोरटयांनी संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेट
संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळणार?; संभाजीराजेंची भूमिका मात्र गुलदस्त्यात