IND VS SA : दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा ! हार्दिक-कार्तिकचे झाले कमबॅक

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND VS SA) सीरिजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. तसेच भारताचा विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिक याचं तीन वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे.

या सीरिजसाठी (IND VS SA) भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्यामुळे केएल राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे शिखर धवनची या सीरिजसाठी (IND VS SA) निवड करण्यात आली नाही. मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिजसाठी शिखर धवन टीमचा कर्णधार होता. मात्र तरीदेखील त्याला या सिरीजमध्ये संघात स्थान देण्यात आले नव्हते.

भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टी-20 टीम
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब