Friday, June 2, 2023

संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळणार?; संभाजीराजेंची भूमिका मात्र गुलदस्त्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी शिवसेनेत प्रवेश करावा त्यानंतर आपल्याला उमेदवाराची दिली जाईल, अशी अट संभाजीराजे यांना घालण्यात आली. मात्र यावर योग्य तोडगा निघत न्हवता. अखेर यावर तोडगा निघाला असून आता संभाजीराजे छत्रपती हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. नुकतीच त्यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. मात्र, अजूनही संभाजीराजेंची भूमिका गुलदस्त्यात आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आवश्यक इतकी मते कुठल्याच राजकीय पक्षाकडे नसल्यामुळे सहाव्या जागेवर संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यातच शिवसेनेनेकडूनही जागा लढवण्यात येणार असल्याचे जाहीर करत संभाजीराजेंना उमेदवारी देण्याचा निर्णय सेनेने घेतला होता.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली. त्यावर दोन दिवसात चर्चा पार पडल्यानंतर अखेर शिवसेनेकडून संभाजीराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील निवडणुकीत भाजप तर यंदा शिवसेना

संभाजीराजे छत्रपती यांना मागील निवडणुकीच्यावेळी भाजपामी पाठींबा दिला होता. ते भाजप पुरस्कृत राष्ट्रपती शिफारसीने राज्यसभेवर निवडून गेले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. पण आता शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार म्हणून निवडून आणणार असल्याचा निर्णय घेतला आहे.