शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात शेतकऱ्यांना बेदम मारहाण

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे शेतीच्या बांधावरून दोघा शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे तर आटपाडी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेवाडी मध्ये धोंडीराम शिरकांडे याची 40 एकर जमीन आहे. त्याच्याच बाजूला संदीप शिरकांडे यांची जमीन आहे. या दोघांच्या मध्ये शेतीच्या बांधावरून अनेक वर्ष्यापासून वाद आहे.

2001 मध्ये न्यायालयात दावा देखील दाखल आहे. पण 4 मार्चला स्वप्नील शिरकांडे आणि मचिंद्र शिरकांडे हे जमिनीचा बांध फोडत असताना धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे समजावून सांगत होते. या बांधावरून सहा जणांनी धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे याना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ धोंडीराम यांच्या मुलाने कॅमेरात कैद केले आहे.

याप्रकरणी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. स्वप्नील शिरकांडे, मचिंद्र शिरकांडे, बाबुराव जगताप, महादेव जगताप, प्रशांत जगताप, दादासाहेब जगताप, अशी गुन्हा दाखल झालेल्या ची नावे आहेत. आटपाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here