मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. या योजनेत ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले आणि कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. तसेच कर्ज माफी देखील देण्यात आली. मात्र ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हाताने मुंबईत बोलवून कर्ज माफीचे प्रमाणपत्र दिले तेच शेतकरी आज कर्जमाफीपासून वंचित आहेत. या संदर्भात आज धनंजय मुंडे यांनी विधी मंडळात आवाज उठवला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.
गाजावाजा करत सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना आणली मात्र ही योजना फसवी निघाली! सरकारची जुमलेबाजी आज पुराव्यानिशी सभागृहात उघड केली. ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र वाटत कर्जमाफी झाल्याचा बोलबाला केला त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच नाही. pic.twitter.com/j5OEJ9ynfb
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 21, 2019
वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर या शेतकऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई बोलावून दोन वर्षांपूर्वी कर्जमाफीची प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र त्या शेतकऱ्याला अद्याप कर्ज माफी देण्यात आली नाही. हा शेतकरी आज धनंजय मुंडे यांना भेटला याने मुंडेंना निवदेन दिले. यानंतर मुंडेंनी हा मुद्दा विधी मंडळात मांडला.