हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३-४ आठवड्याची वाट बघावी लागणार नाही. अवघ्या ५ मिनिटात कर्ज मिळेल. यासाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने भारतीय रिझर्व्ह बँकेची शाखा (RBIH) सोबत पार्टनरशिप केली आहे. कृषी कर्जाबाबतची प्रक्रिया जलद पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना वेळेत पैशाचा लाभ मिळावा यासाठी नाबार्ड आणि आरबीआयने ही भागीदारी केली आहे. RBIH चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी त्यावर सही केली आहे.
नाबार्डने म्हटले आहे की ते रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) च्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट (PTPFC) सह ई-KCC कर्ज प्लॅटफॉर्म जोडेल. RBIH हि RBI ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. शेतकऱ्यांचे काम सोप्प व्हावं आणि कर्ज मिळवण्यासाठी त्यांना जास्त त्रास होऊ नये हा हेतू लक्षात ठेऊन नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (RRBs) डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कर्ज प्रणाली प्लॅटफॉर्म तयार केला आहे.
याबाबत नाबार्डचे अध्यक्ष शाजी के. व्ही. म्हणाले की, कृषी कर्जाचे डिजिटायझेशन बँकांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जाचे वाटप करण्यात येईल. यामुळे नाबार्डच्या ग्रामीण समृद्धीला चालना देण्याच्या धेय्याला आणली बळ मिळेल. या करारानंतर देशातील 12 कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळविण्यासाठी लागणारा तीन-चार आठवड्यांचा कालावधी अवघ्या ५ मिनिटांवर येईल. म्हणजेच देशातील शेतकऱ्याला फक्त ५ मिनिटात कर्ज मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हि मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.