खुशखबर! या यंत्राच्या खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 50% अनुदान, लवकर करा अर्ज…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळात भारतीय शेतीचे चित्र संपूर्ण बदलत चालले आहे. पूर्वी शेतीकाम मजुरांच्या तसेच बैलांच्या साहाय्याने केले जात असे. मात्र आता यामध्ये यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला आहे. आता शेतीची कामे यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. अशातच सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक भेट दिली आहे. एवढेच नाही तर खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या खरेदीवरही सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. या सर्व गोष्टींचा संपूर्ण मसुदा तयार करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन अर्ज करा. यासाठी तुम्हाला आधार कार्डसह काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

शेतीची पूर्वमशागत ते अगदी पीक काढणीपर्यंत सर्व कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात आहेत. विशेष म्हणजे ट्रॅक्टर मजूरटंचाईचा सामना करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरत आहे. शेती कामासाठी मजूर टंचाई प्रकर्षाने जाणवत असल्याने आता ट्रॅक्‍टरचा वापर दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढू लागला आहे. मात्र असे असले तरी प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घेणे हे शक्य नाही. ट्रॅक्टरच्या किमती या अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या आवाक्याबाहेर असतात. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी करणे शक्य नाही. यामुळे आता याबाबत शासनाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान द्यायला सुरुवात केली आहे. मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करता येणे अशक्य आहे अशा शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ मिळत आहे.

पीएम किसान ट्रॅक्टर योजना –

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सरकारने 2022 मध्ये सुरू केली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेची मदत घेऊ शकता. अर्जासाठी जवळच्या ब्लॉक किंवा कृषी केंद्राला भेट देऊन संपर्क साधता येईल. यासोबतच अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन सुविधाही देण्यात आली आहे. इच्छुक शेतकरी घरी बसूनही पीएम ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सर्वात स्वस्त शेती उपकरणे कुठे मिळतात?

शेतकरी मित्रानो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शेती उपकरण विकत किंवा भाड्याने घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हला अशी एक जागा सांगणार आहे जिथे सर्वात स्वस्त अन चांगल्या क्वालिटीची उपकरणे मिळतात. यासाठी तुम्हाला आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतीशी संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ फायदा तुम्हाला होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषीच्या माध्यमातून जमीन मोजणी, सातबारा उतारा, भाडेतत्वावर सेवा, पशु खरेदी विक्री सुविधेचा लाभ अगदी मोफत मध्ये मिळत आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

इतर अनुदान योजना –

यानंतर शासनाने गहू काढणीसाठी हार्वेस्टर मशीन खरेदीसाठी अनुदान योजनाही सुरू केली आहे. कारण कापणी यंत्राचा बाजारभाव खूप जास्त आहे. जे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याकडे बजेटच नसते. म्हणूनच सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन खरेदी करण्यासाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देते. याशिवाय कृषी यंत्र प्रशिक्षण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना चार लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, सरकार भूमिहीन शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी अनुदान देते.