हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून सर्वाना वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याची माहिती दिली. देशातील सर्व टोल नाक्यांवर 1 जानेवारी, 2021 पासून FASTag बंधनकारक करण्यात आले आहेत. चारचाकींपासून पुढे सर्वचत वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर न थांबता पुढे जाता येणार आहे. तसेच पैसे देण्याच्या वेळासोबतच इंधनाचा खर्चही वाचणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नव्या वर्षात तुम्ही जर बाहेर जाणार असाल आणि तुमच्या वाहनामध्ये फास्टॅग नसेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सध्या टोलनाक्यावर अनेकदा टॅग नसतानाच फास्टॅगच्या मार्गिकेत अनेक लोक घुसताना दिसतात. वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे असं होत असतं. मात्र, 1 जानेवारीपासून हे चित्रं दिसणार नाही.
फास्टॅग म्हणजे काय ?-
वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’