कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात! मालगाडीचे धडक दिल्याने कार कोसळली रेल्वे ट्रॅकवर; तिघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण रोज कोणत्या ना कोणत्या भागातून अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा कर्जत-नेरळ मार्गावर (Karjat-Neral Road) एक कार रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याशी भयानक घटना घडली आहे. ही कार रेल्वे ट्रॅकवर कोसळण्यापूर्वी तिला समोरून येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली होती. त्यामुळे या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कर्जत-नेरळ मार्गावरील अपघाताची घटना मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातग्रस्त कार ही कर्जतहून नेरळच्या दिशेने जात होती. या कारमध्ये पाच ते सातजण प्रवास करत होते. याचवेळी एका मालगाडीने येऊन कारला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, कार थेट उलटून रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्यामुळे या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी धाव घेतली. यानंतर त्यांनी, बचावकार्य सुरू करत जखमींना तातडीने उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जिला पोलिसांकडून पुन्हा सुरळीत करण्यात आले. सध्या या अपघाताबाबत परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.