भीषण अपघात : पतीचा मृत्यू , पत्नी गंभीर जखमी

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,
कोल्हापूर रॊडने सांगलीकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्कोडा या चारचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील बबन नलवडे हे जागीच ठार झाले असून पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी मंगल या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बबन नलवडे आणि त्यांची पत्नी मंगल असे दोघेजण त्यांच्या नव्या ऍक्टिवावारू कोल्हापूर रॊडने सांगलीकडे येत होते. ते मारुती शोरूमसमोर आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कोडा या चारचाकीने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गाडीवरून उडून पडले. यामध्ये बबन नलवडे हे जागीच ठार झाले तर मंगल या चारचाकीने काही अंतर फरफटत नेल्याने जखमी झाल्या आहेत.त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे मिळून ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसानी चारचाकीचा चालक श्रीप्रसाद पर्वतरेड्डी वडगीरे यास अटक केली आहे. पोलिसानी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. याबाबत मयत बबन नलवडे यांचा मुलगा संतोष बबन नलवडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसानी चारचाकीचा चालक वाडंगिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.