विरार : हॅलो महाराष्ट्र – देशभरात सगळीकडे नवरात्र साजरी केली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये लोक पूर्णपणे बेधुंद होऊन नाचत असतात. मात्र या दरम्यान विरारमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू (died) झाला. हि बातमी ऐकताच वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनीदेखील आपले प्राण (died) सोडले.
काय घडले नेमके?
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवरात गरबा खेळत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याच्या वडिलांनी आणि तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू (died) झाला होता. यानंतर आपला मुलगा गेल्याचे समजताच वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. यात त्यांचाही जागीच मृत्यू(died) झाला.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. एका क्षणात वडील आणि मुलाचा मृत्यू (died) झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जैन कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय