Monday, February 6, 2023

बाप- लेकाच्या नात्याला पुन्हा काळिमा ! बापानेच केला पोटच्या मुलाचा खून

- Advertisement -

बीड – औरंगाबाद शहरातील प्रा. राजन शिंदे खून प्रकरण ताजे असताना आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दैठणा येथे अज्ञात व्यतीने एका अडोत्तीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी अवघ्या बारा तासांच्या आत जलदगतीने तपास करून सभ्यतेचा आव आणणाऱ्या मारेकऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कसून चौकशी केली. त्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली.

केज तालुक्यातील दैठणा येथे विलास चंद्रकांत मुळे (वय ३८) या विवाहित तरुणाचा अज्ञाताने खून करून मृतदेह शाळेजवळून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात टाकल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता.२०) घडली होती. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना हा खून कुणी केला? त्याचा शोध लावण्याचे पोलीसांसमोर आवाहन होते. कारण मृत विलासला जरी दारू पिण्याची सवय असली तरी त्याचे गावात कुणाशी भांडण नव्हते की इतर कारणावरून कुणाशी वैर नव्हते. त्यामुळे त्याचा खून कुणी केला? याचा तपास लावण्याचे काम अवघड होते. याच दरम्यान घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तपासकामी श्वान पथकाला मदतीसाठी पाचारण केले. घटनास्थळाचा पंचनामा करून सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उच्चस्तरीय तपासणी करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

मृत विलासच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होताच त्याच्या खून प्रकरणी संशयित आरोपी म्हणून त्याच्या जन्मदाता वडील चंद्रकांत उद्धव मुळे (वय -६०) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या खून प्रकरणाच्या तपासकामी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार शिवाजी शिनगारे, अशोक नामदास, अनिल मंदे, जसवंत शेप, शेख, शेषेराव यादव, हुंबे व दिलीप गित्ते या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली