Monday, January 30, 2023

माझ्याकडे सर्व रेकॉर्ड, मी काय ते महाराष्ट्राला माहिती, आमच्या रक्तामध्ये बेईमानी नाही”- अजित पवार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरंडेश्वर साखर कारखान्याच्या आर्थिक घोटाळ्यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून निशाणा जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “राज्यात फक्त जरंडेश्वर कारखान्याचाच व्यवहार झालेला नाही. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, माझ्या आयुष्यात मी कधी बेईमानी केली नाही. आमच्या रक्तामध्ये बेईमानी नाही”, उद्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगेन”, असा इशाराच अजित पवारांनी विरोधकांना दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून केल्या जा असलेल्याआहे. दिले आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, मी उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती जाहीर करणार आहे. “जरंडेश्वर साखर कारखाना ही केस ईडीकडे आहे. कोर्टात प्रकरण आहे. भाजपाचं सरकार असताना सीआयडी, एसीबीची चौकशी झाली. इओडब्ल्यूचीही चौकशी झाली. सहकार विभागाने निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत देखील चौकशी झाली.

- Advertisement -

राज्यात फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेलेला नाही. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. माझ्याकडे त्याची सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे. त्याची सगळी कागदपत्र देखील माझ्याकडे आहेत. उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेईन. राज्यात सुरुवातीपासून किती कारखाने, कुणाच्या कारकिर्दीत किती किमतीला विकले गेले याची माहिती देईन. काही कारखाने ३ कोटी, ४ कोटी, १२-१५ कोटी अशा किमतीला विकले गेलेत”, असं त्यांनी सांगितलं.

काहीजण जाणीवपूर्वक त्याच त्याच गोष्टी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतात. आम्ही प्रत्येक वेळी माध्यमांसमोर जात नाही. माझ्याविरुद्ध काही लोकांनी गरळ ओकण्याचं देखील काम केलं की मी बेईमानी केली. मी ९० सालापासून राजकारणात काम करतोय. उभा महाराष्ट्र मला ओळखतो की मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का आहे. मी कधीही खोटं बोलणार नाही जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे. , असं अजित पवार यावेळी म्हणाले.