हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. तसेच ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर करण्यात आली आहे असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. हे नवीन दर 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, वेगवेगळ्या मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर आता जास्तीत जास्त 6.5 टक्के व्याज दिले जाणार आहे. इथे एक महत्वाची माहिती अशी कि, आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व मुदतीच्या FD वर अर्धा टक्का जास्त व्याज दिले जाईल.
इंडसइंड बँकेच्या 7-14 दिवस आणि 15-30 दिवसांच्या FD वर अनुक्रमे 2.75 टक्के आणि 3 टक्के व्याज मिळेल तर 31-45 दिवसांच्या FD वरील व्याजदर 3.5 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी हा दर 3.25 टक्के होता. त्याचप्रमाणे, बँक आता 46-60 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.65 टक्के व्याज देत आहे. तसेच 61-90 दिवस, 91-120 दिवस आणि 121-180 दिवस मुदत असलेल्या डिपॉझिट्सवरील व्याजदर आधीसारखाच ठेवण्यात आला आहे. या डिपॉझिट्सवर आता गुंतवणूकदारांना आधीप्रमाणेच अनुक्रमे 3.75 टक्के, 4 टक्के आणि 4.5 टक्के व्याज मिळेल. FD Rates
181-210 दिवसांच्या FD वरील व्याजदर 4.6 टक्क्यांवरून 4.75 टक्के करण्यात आला आहे. तसेच 211 दिवस ते 269 दिवसांच्या FD वरील व्याजदर 4.75 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. याबरोबरच बँक आता 270 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 5.5 टक्के जास्त व्याज देत आहे. तसेच 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी आणि 2 वर्ष ते 61 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ते अनुक्रमे 6 टक्के आणि 6.5 टक्क्यांवर आहेत. बँक आता 61 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 6 टक्के व्याज देत आहे. FD Rates
तसेच ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD वर बँकेकडून 0.50 टक्के जास्त व्याज दिले जात आहे. आपल्या निवेदनात बँकेने सांगितले आहे की, मात्र 2 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या FD साठी ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ दिला जाणार नाही. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indusind.com/in/en/personal/rates.html
हे पण वाचा :
Bank Holidays : जूनमध्ये बँकांना 12 दिवस असणार सुट्टी !!! सुट्ट्यांची लिस्ट तपासा
PNB ने आपल्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
LPG Price : व्यावसायिक गॅस सिलेंडर 136 रुपयांनी स्वस्त !!! घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही
Investment Tips : वयाच्या 40 नंतर भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या
FD Rates : आता ‘या’ NBFC च्या स्पेशल FD वर मिळणार 7.45% व्याज !!!