हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून या महिन्यात रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्स किंवा 0.40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. यानंतर एकीकडे कर्जावरील व्याजदर वाढत असतानाच दुसरीकडे अनेक बँकांच्या FD वरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. आता खाजगी क्षेत्रातील धनलक्ष्मी बँकेने देखील आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 26 मे 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
1927 मध्ये केरळातील त्रिशूर येथे धनलक्ष्मी बँक लिमिटेडची स्थापना झाली. 94 वर्ष जुनी असलेल्या या बँकेचे देशभरात सुमारे 533 टच पॉइंट्ससह आहेत. 26 मे पासून बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates
यानंतर आता बँक 7 ते 45 दिवसांच्या कालावधीच्या FD वर 3.25 टक्के तर 46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या FD वर 3.75 टक्के व्याजदर देईल. याआधी 91 दिवसांपासून ते 179 दिवसांपर्यंतच्या FD वरील व्याजदर 4 टक्के होता, मात्र त्यामध्ये आता 50 बेसिस पॉंईटस् ने वाढ होऊन 4.50 टक्के करण्यात आला आहे, तर 180 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये 25 बेसिस पॉंईटस् ने वाढ होऊन 4.25 ते 4.50 टक्के झाला आहे. FD Rates
धनलक्ष्मी बँक FD Rates (घरगुती आणि अनिवासी मुदत ठेवी, 26 मे पासून प्रभावी)
7 ते 14 दिवस – 3.25%
15 ते 45 दिवस – 3.25%
46 ते 60 दिवस – 3.75%
61 ते 90 दिवस – 3.75%
91 ते 179 दिवस- 4.50%
180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी- 4.50%
1 वर्ष ते 2 वर्षे – 5.15%
555 दिवस – 5.55%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे – 5.30%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 5.40%
1111 दिवस ते 10 वर्षे – 5.75%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 5.50%
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dhanbank.com/header/interest_rates.aspx
हे पण वाचा :
Post Office : सरकार ‘या’ छोट्या बचत योजनांवरील व्याजदर वाढवणार ???
आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!
EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Bamboo Farming : सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा लाखो रुपये !!!
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे