हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : दीर्घकाळापासून एफडीवरील व्याजदरात कपात झाल्यानंतर आता त्याच्या व्याजदरातील वाढीचा काळ सुरु झाला आहे. आता एकामागून एक बँका आणि एनबीएफसी कडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली जात आहे. ICICI बँकेनंतर आता नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असलेल्या ICICI होम फायनान्सने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
हे लक्षात घ्या कि, या इंडस्ट्री मधील सर्वोच्च क्रेडिट रेटिंग हे ICICI HFC कडे आहेत. ज्यामध्ये CRISIL द्वारे AAA/Stable, ICRA द्वारे AAA/Stable आणि CARE द्वारे AAA/स्टेबल यांचा समावेश आहे. या NBFC मध्ये डिपॉझिट्स करण्यासाठी किमान 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ICICI HFC 12 ते 120 महिन्यांच्या विविध कालावधीसाठी गुंतवणूकीचे पर्याय देते. FD Rates
वृद्ध व्यक्तींना जास्त व्याज
ICICI HFC फिक्स्ड डिपॉझिट्स योजनेवर, मासिक, त्रैमासिक, वार्षिक किंवा चक्रवाढ आधारावर व्याज पेमेंट मिळेल. ही फर्म वृद्धांना 0.25 टक्के जास्त व्याजदर देखील देते. FD Rates
‘या’ FD ची वैशिष्ट्ये
ICICI HFC FD साठी अनेक सुविधा देते. यामध्ये गुंतवणूकदाराला 1 ते 10 वर्षांपर्यंतच्या विविध मुदतीच्या पर्यायांसह कधीही पैसे काढता येतील. तसेच येथे एफडी डिपॉझिट्सवर ठेवलेल्या रकमेच्या 75% पर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते. ज्यामध्ये डिपॉझिट्सवरील व्याजापेक्षा 2% जास्त व्याज आकारले जाते.
डिपॉझिट्सच्या पहिल्या तीन महिन्यांत ICICI HFC डिपॉझिट्सवर मुदती आधी पैसे काढण्याची परवानगी नाही. यावेळी जर ठेवीदाराचा मृत्यू झाला तर मात्र FD मुदती आधी बंद करण्याची परवानगी आहे. FD Rates
व्याज दर
कंपनी क्युम्युलेटिव्ह प्लॅन अंतर्गत 5.25% – 6.95% व्याज दर देते. त्याच वेळी, नॉन-क्युम्युलेटिव्ह प्लॅन अंतर्गत कंपनी मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत 5.10% – 6.75%, त्रैमासिक उत्पन्न योजनेअंतर्गत 5.15% – 6.80% आणि वार्षिक उत्पन्न योजनेअंतर्गत 5.25% – 6.95% व्याज देते. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicihfc.com/fixed-deposit
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
खुशखबर !!! Crude Oil पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार ???
Petrol Diesel Price : महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
BSNL च्या प्रीपेड प्लॅनमध्ये 3 रुपयांत मिळवा 1 GB डेटासहित अनलिमिटेड कॉलिंग !!!