हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI ने रेपो दरात आतापर्यँत 4 वेळा वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे जवळपास सर्वच बँकाकडून आता FD वर जास्त व्याज दिले जात आहे. हे लक्षात घ्या कि, देशातील सर्वांत मोठ्या बँकांकडूनही (SBI, HDFC Bank, ICICI Bank आणि Axis Bank) आता FD वर जास्त व्याज दर देत आहेत.
FD मध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच गॅरेंटेड रिटर्न मिळतो. ज्यामुळेच अनेक लोकांकडून एफडीमध्ये पैसे गुंतवले जातात. आता बँकांनी व्याजदर वाढवल्यानंतर एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सामान्यतः ग्राहकांकडून FD साठी मोठ्या बँकांनाच प्राधान्य दिले जाते. चला तर मग देशातील मोठ्या बँका FD वर किती व्याज दर देत आहेत ते जाणून घेउयात …
SBI
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3% ते 6.25% व्याज दर देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 6.90 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. 22 ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. याशिवाय SBI कर्मचारी आणि SBI पेन्शनधारकांना 1 टक्के जास्त व्याज दिले जाईल. FD Rates
ICICI Bank
ICICI बँकेने देखील आता आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी बँकेने FD वरील व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. आता बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3 टक्के ते 6.60 टक्के व्याज दिला जाईल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.5 टक्के ते 7 टक्के असेल. FD Rates
HDFC Bank
HDFC बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3 टक्के ते 6.5 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 3.5 ते 7 टक्के व्याज दिले जात आहे. HDFC बँक आता 5 वर्षांच्या कालावधीसाठी 5 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 0.25% अतिरिक्त व्याज देत आहे. FD Rates
Axis Bank
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅक्सिस बँकेकडून आता 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के, 46 दिवस ते 60 दिवस आणि 61 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर ग्राहकांना 6 महिने ते 9 महिन्यांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज मिळत आहे.
एक्सिस बँक 9 महिने ते 1 वर्षाच्या FD वर 5.50 टक्के, 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या FD वर 6.25 टक्के, 15 महिने ते 18 महिन्यांच्या FD वर 6.40 टक्के आणि 18 महिने ते 3 वर्षांच्या FD वर 6.50 टक्के व्याज देत आहे. त्याचप्रमाणे, बँक आता 3 वर्षे ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर देखील 6.50 टक्के व्याज दर देईल. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/docs/default-source/interest-rates-new/fixed-deposit-wef-01-10-2022.pdf
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा