हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ झाल्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चालू आर्थिक वर्ष चांगले ठरले आहे. RBI ने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. सध्या, परदेशी बँका, छोट्या खाजगी बँका आणि स्मॉल फायनान्सिंग बँका तीन वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत. तसेच दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँका या बाबत मागे पडल्या आहेत.
BankBazaar च्या माहिती नुसार, तीन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर टॉप 10 बँकांकडून सरासरी 7.6 टक्के व्याज दर दिला जातो आहे. तर आजच्या या बातमीमध्ये आपण FD वर तीन वर्षांच्या कालावधीसाठी टॉप 10 बँकांच्या व्याजदराबाबतची (FD Rates) माहिती जाणून घेयुयात… .
परदेशी बँका आघाडीवर
एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या विदेशी बँकांमध्ये इंडसइंड बँक, ड्यूश बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक या आघाडीवर आहेत. ड्यूश बँकेकडून तीन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.75 टक्के दराने व्याज देते. तसेच, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक देखील तीन वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज देत आहेत. FD Rates
खाजगी बँकांमधील व्याजदर जाणून घ्या
एफडीवर सर्वाधिक व्याजदर देण्याच्या याबाबतीत देशातील खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इंडसइंड बँक पुढे आहेत. या बँकांच्या एफडीमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.26 लाख रुपयांपर्यंत वाढते. तसेच DCB बँकेकडून तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याज मिळते. या बँकेच्या FD मध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये तीन वर्षांत वाढून 1.25 लाख रुपये होतील. FD Rates
सार्वजनिक क्षेत्रात युनियन बँक देते जास्त व्याज
देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत. या बँकेच्या FD वर 7.30 टक्के व्याजदर मिळेल. त्याचप्रमाणे बंधन बँक, सिटी युनियन बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एफडीवर सर्वाधिक व्याज देणार्या स्मॉल फायनान्सिंग बँकांमध्ये पुढे आहेत. या बँका तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याज देत आहेत. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.unionbankofindia.co.in/english/interest-rate.aspx
हे पण वाचा :
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत झाली वाढ, पहा आजचे दर