नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर या ठिकाणच्या एका वसतीगृहात दोन विद्यार्थ्यांच्या गटामध्ये किरकोळ कारणावरून मोठा राडा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या जाळपोळीत पाच मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. आदिवासी बहुल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना शांत केले. या प्रकरणी दोषी असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एका शुल्लक कारणावरून हि तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याच्या दोन गटात अनेक जण किरकोळ जखमी
विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हा राडा झाला आहे. या भांडणात दोन मोटारसायकली जाळण्यात आल्या तर तीन मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच इस्लापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. तसेच या प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
किनवट तालुक्यातील इस्लापुर इथल्या या वसतिगृहात सहावी ते बारावी वर्गात शिकणारे विद्यार्थी वास्तव्यास आहेत. हे वसतिगृह राज्य सरकारच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून चालवण्यात येते. या ठिकाणी राज्याच्या विविध भागातील आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी वास्तव्याला असतात. यातूनच या विद्यार्थ्यांमध्ये हे दोन गट पडले आणि हि हाणामारीची घटना घडली.