औरंगाबाद – जिल्ह्यात विशेष लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. ओमायक्रोन विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोविड नियमांचे पालन करावे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची नियमानुसार तपासणी करावी जे तपासणीसाठी विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. तसेच
जिल्ह्यातील प्रवेश ठिकाणांवर परिवहन विभागाने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांची नियमानुसार काटेकोरपणे तपासणी करावी असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यलायत आयोजित कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, लसीकरण झाले तर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होईल त्यामुळे सर्व नागरिकांनी लसीकरणाच्या विशेष मोहिमेला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. ज्या भागात लसीकरण कमी आहे तेथील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे. हातगाडी चालक, दुकानदार यांच्या लसीकर करण्यावर अधिक भर द्या जर कोणी तपासणी साठी विरोध करीत असेल अशा वर गुन्हे दाखल करा असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत आदेश दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.