नवी दिल्ली । व्यापारात मात खात असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) अखेर भारताचे (India) महत्त्व समजले आहे. त्यामुळे आपले व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दोन वर्षानंतर आपल्या खाजगी क्षेत्राला साखर (Sugar), कापूस (Cotton) आणि धाग्यांची आयात (Import) करण्याची परवानगी दिली आहे.
भारत वगळता इतर देशांकडून साखर, कापूस आणि धाग्यांची आयात करणे पाकिस्तानला महाग पडत होते. पाकिस्तानच्या ढिसाळ अर्थव्यवस्थेला हा भार सहन करता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने कापूस आणि धाग्यांच्या आयातीला परवानगी दिली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले गेले आहे की,”पाकिस्तानमध्ये महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेणार्या या संस्थेने खासगी क्षेत्राला भारतातून 5 लाख टन साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे.”
भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये साखरेची किंमत दुप्पट आहे
भारत हा कापसाचा सर्वात मोठा उत्पादक देश आणि जगातील दुसर्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. पाकिस्तानला साखर विक्रीमुळे देशांतर्गत बाजारात त्याचा साठा कमी होईल. यामुळे, रमजानपूर्वी पाकमध्ये आकाशाला भिडणार्या साखरेची किंमत खाली आणता येईल. सध्या पाकिस्तानमध्ये साखरेचा 694 डॉलर (50,777 भारतीय रुपये) प्रति टन वर व्यापार होत आहे. हे भारतीय साखरेच्या दुप्पट दरापेक्षा किंचित कमी आहे. भारतीय कापसाबद्दल बोलायचे झाल्यास ते इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानला 5% स्वस्त पडेल.
आर्टिकल-370 रद्द झाल्यानंतर संबंध खराब झाले
ऑगस्ट 2019 मध्ये भारत सरकारने जम्मू-काश्मीरला आर्टिकल-370 अंतर्गत दिलेला विशेष दर्जा रद्द केला. केंद्रशासित प्रदेश बनवून लडाखला राज्यातून वेगळे केले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताशी व्यावसायिक संबंध तोडले. साखर आणि कापसाच्या आयातीला परवानगी देऊन या दोघांच्या नात्यात आलेला कडवटपणा दूर करण्यासाठी अलीकडेच मुत्सद्दी पावले उचलली जात असताना ही बातमी समोर आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group