हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. या नवीन वर्षाबाबत लोकं अनेक नव्या आशा बाळगून आहेत. मात्र या नवीन वर्षात बँकेचे लॉकर, इन्शुरन्स पॉलिसी, क्रेडिट कार्ड आणि एनपीएस इत्यादींशी संबंधित अनेक नियमात बदल केले गेले आहेत. जे आजपासून लागू झाले आहेत. चला तर मग याचा आता आपल्या दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होईल ते जाणून घेउया…
इन्शुरन्स घेण्यासाठी KYC बंधनकारक
1 जानेवारीपासून ग्राहकांना इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी KYC डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने सर्व प्रकारच्या लाइफ, जनरल आणि हेल्थ इन्शुरन्सच्या खरेदीसाठी KYC करणे बंधनकारक केले आहे. Financial Changes
क्रेडिट कार्डच्या नियमात बदल
1 जानेवारी 2023 पासून अनेक बँकांकडून क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी आपल्या रिवॉर्ड पॉईंट्स प्लॅनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेले रिवॉर्ड पॉईंट्स 31 डिसेंबरपर्यंतच रिडीम करावे लागतील. Financial Changes
बँकेच्या लॉकरशी संबंधित नियमातही बदल
1 जानेवारीपासून RBI कडून बँकेच्या लॉकरशी संबंधित नियमात बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमांतर्गत आता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाले तर आता यासाठी बँकेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्याच बरोबर बँकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे जर ग्राहकाचे नुकसान झाले तर यासाठी बँक लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट पर्यंत बँकेचे दायित्व असेल. मात्र हा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना बँकेशी नवीन लॉकर करार करावा लागेल. Financial Changes
NPS आंशिक पैसे काढण्याच्या नियमात बदल
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून NPS मध्ये योगदान देणाऱ्या खातेदारांसाठी पैसे काढण्याबाबत एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, आता सरकारी क्षेत्रातील ग्राहकांना (केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्था) आंशिक पैसे काढण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र तो फक्त नोडल ऑफिसरकडेच सादर करावा लागेल. Financial Changes
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html
हे पण वाचा :
Train Cancelled : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वेकडून 221 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Loan : फक्त 1% व्याजावर मिळेल कर्ज !!! अशा प्रकारे मिळवा फायदा
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये फक्त एकदाच प्रीमियम भरून मिळेल दरमहा पेन्शन
Flipkart Sale : 6999 रुपयांमध्ये मिळत आहेत ‘हा’ स्मार्टफोन, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंतच
Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या