सोन्याच्या किंमती 5547 रुपयांनी विक्रमी पातळीवर वाढल्या आहेत, पुढील काही दिवसांत यामुळे कमी होऊ शकतात किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती सातत्याने घसरत आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्यावर विक्रीचा दबाव दिसून आला आहे. एमसीएक्सवर डिसेंबरच्या वितरणासाठीचे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,653 पर्यंत घसरले. त्याचबरोबर चांदीच्या फ्युचर्सची किंमत प्रति किलो 61,512 रुपयांवर आली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, भारतात 17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होताच देशात सणासुदीचा हंगाम सुरू होईल. यामुळे देशात सोन्याची स्पॉट डिमांड वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरची वाढ कायम राहिल्यास देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते.

सोन्याचे भाव 5547 रुपयांनी झाले स्वस्त
ऑगस्टमध्ये सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 56,200 , तर चांदी 80,000 प्रति किलोच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. आतापर्यंत सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 5547 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर चांदीचा दर प्रति किलो 18488 हजार रुपयांनी घसरला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती खाली आल्या
जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 0.1% ने घसरून 1,906.39 डॉलरवर बंद झाले. या आठवड्यात आतापर्यंत सोन्याच्या किंमती 2 टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. अन्य मौल्यवान धातूंपैकी चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 24.26 डॉलर प्रति औंसवर, तर प्लॅटिनम 0.2% ने वाढून 866.05 डॉलरवर बंद झाली.

दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते
7 ऑगस्ट 2020 रोजी सराफा बाजारात सोन्याची किंमत 56200 च्या अखेरच्या उच्चांकी पातळीवर गेली. सोन्याची किंमत बर्‍याच फॅक्टर्सवर अवलंबून असते, त्यामुळे सोनं स्वस्त होऊ शकतं असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण सर्व देश त्यांची अर्थव्यवस्था बळकट करण्यात गुंतलेले आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे की, पुढील वर्षीपर्यंत, मजबूत डॉलरसह सोन्याच्या किंमतीत अचानक वाढ होऊ शकते.

अमेरिकेत निवडणुका होत असल्याने सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीची मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच डॉलरमध्येही तेजीची अपेक्षा आहे. भारतात 17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाची सुरूवात होत असल्याने देशात सणासुदीचा हंगाम सुरु होईल. यामुळे देशात सोन्याची स्पॉट डिमांड वाढण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकन डॉलरची मजबुती आणि अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमती खाली आल्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी आणखी एका मदत पॅकेजबाबत उत्सुक आहे, परंतु सिनेटचे नेते मिच मॅककॉनेल यांनी ते नाकारले. 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकन प्रोत्साहन सौदा संपुष्टात येण्याची शक्‍यता नसल्याच्या पार्श्वभूमीवर सोने या महिन्यात मर्यादित श्रेणीत व्यापार करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment