हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाकाळात अनेक प्रकारचे नियम जारी करण्यात आले ज्यामध्ये बँकांशी संबंधित नियमही आहेत. या परिस्थितीत काही लोकांना बँकांशी संबंधित कामे करण्यात अडचणी येत आहेत. हे पाहता आता १० गोष्टीसाठी एटीएममध्येच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे एटीएम आता केवळ पैसे काढणे किंवा बॅलन्स तपासणे इतपत मर्यादित न राहता तिथे इतरही कामे करता येणार आहेत. यामध्ये मोबाईल रिचार्ज सहित इतर गोष्टींचा समावेश आहे.
संचारबंदीच्या काळात एअरटेल ने मोबाईल रिचार्जची सुविधा एटीएम मध्ये उपलब्ध करून दिली आहे. आपण डेबिट कार्डच्या साहाय्याने रिचार्ज करू शकता. आपण एटीएममधून आयकर देखील भरू शकणार आहात. हा ऍडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट, रेग्युलर असेसमेंट नंतर चाअसेल. यासाठी आधी बँकेत जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा अकॉउंटमधून पैसे कापले जातील, नंतर एटीएम एक युनिट नंबर जनरेट करेल. ज्याला आयईएन म्हणतात. २४ तासानंतर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तपासून सीआयएन नंबरच्या मदतीने चलन प्रिंट करून घ्यावे लागेल. कॅश डिपॉझिट ही एटीएम मध्ये करता येते. विमा प्रीमियम एटीएम मध्ये भरता येणार आहे.
कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. काही बँका प्री अप्रूव्ह छोट्या रकमेचे कर्ज देतात. एटीएम द्वारे आता कॅश ट्रान्सफर करता येणार आहे. याआधीही ही सुविधा उपलब्ध होती. आता पाणी, वीज, टेलिफोन बिल देखील एटीएम मधून भरता येणार आहे. याबरोबरच डोनेशन देणे, एफडी उघडणे, चेक बुक विनंती या गोष्टीही एटीएमद्वारे करता येणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना या गोष्टींसाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही आहे.