६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा … Read more

केंद्रानं केली पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ, पण..

नवी दिल्ली । कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारनं सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला असून, यामुळे अर्थ व्यवहाराचं चक्र जवळपास ठप्प झालं आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसूलाचा ओघ अटल्यासारखीचं स्थिती आहे. यातून मार्ग काढण्यास केंद्रानं सुरूवात केली असून, आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या … Read more

विप्रो पुण्यात उभारणार विशेष कोविड रुग्णालय

पुणे । जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने 450 खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र सरकारसमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे.आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक … Read more

लॉकडाऊनमुळे तब्बल १२ कोटी लोक झाले बेरोजगार

नवी दिल्ली । कोरोनामुळे ओढवलेल्या लॉकडाउनचा जसा जागितक अर्थव्यस्थेवर परिणाम झाला आहे तसा भारतावर सुद्धा झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरु असलेल्या आतापर्यंतच्या दीर्घकालीन लॉकडाउनने देशातील १२ कोटींहून अधिक कामगारांना देशोधडीला लावले आहे. गेल्या महिनाभरात देशात १२ कोटी २० लाख बेरोजगार झाल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा … Read more

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी ‘युवा स्पंदन’चा पुढाकार

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी युवा स्पंदनने पुढाकार घेतला आहे.

गर्दी करू नका! आता दारू खरेदीसाठी मिळणार टोकन

मुंबई । राज्यात दारू विक्रीची दुकान सुरु करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर दारु खरेदीसाठी तळीरामांची एकच झुंबड उडाली आहे. ४० दिवसांनंतर दारू मिळणार असल्यामुळे तळीरामांनी सकाळपासूनच वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या सर्वात दारुच्या दुकानांसमोरील प्रचंड गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकार निर्माण झाला होता. त्यावरही सरकारनं मार्ग … Read more

सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणुन घ्या १० ग्राम सोन्याचे आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झालेली आहे.मंगळवारी सोने स्वस्त झाले.आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमती या झपाट्याने खाली आल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव हा ३३५ रुपयांनी खाली आला आणि बर्‍याच दिवसानंतर सोन्याची किंमत हि १० ग्रॅम साठी ४५,५०० रुपयांवर आली. मंगळवारी सोन्याची किंमत घटून प्रति १० ग्रॅम ४५,४७२ … Read more

पट्ठ्यानं खरेदी केली तब्बल ५२ हजारांची दारू; बिल व्हायरल होताच विक्रेता आला गोत्यात

बेंगळुरू । दारूची दुकान सुरु झाल्यापासून गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सकाळपासूनच या दारू वेड्यांनी वाईन शॉपबाहेर लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. मात्र, अशाच एका तळीरामाला नियमबाह्य जास्तीचे मद्यविक्री करणाऱ्या बेंगळुरूतील एका मद्य विक्रेत्याविरोधात राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा … Read more

समजून घ्या! राज्याचं दारुचं गणित; दररोज ‘किती’ लिटर ढोसली जाते दारू

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी तळीरामांची दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. दारुविक्रीच्या निर्णयामुळे व्यसनाधिनता वाढेल आणि यातून घरगुती अत्याचारांत वाढ होईल, अशी मतं दारुबंदी समर्थकांनी … Read more

दिल्लीत केजरीवाल सरकारचा दारुवर ‘कोरोना टॅक्स’!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आज दिल्लीत बऱ्याच ठिकाणी दारूची दुकाने उघडली गेली,पण त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, सोमवारी दिल्ली सरकारने दारूवर ‘कोरोना टॅक्स’ लावला.त्यानंतर दिल्लीत दारू महागली. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार आता दिल्लीत दारूच्या एमआरपीवर ७०% कर आकारला जाईल.सरकारचा हा निर्णय उद्यापासून अंमलात येणार आहे. एमआरपीवर शासनाने ७०% ‘स्पेशल कोरोना … Read more