अरे बापरे! महागाईने गाठला मागील पाच वर्षांतला उच्चांक

मुंबई | सर्वसामन्यांसाठी निराशाजन बातमी आहे. महागाईने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. महागाईची सरकारी आकडेवारी नुकतीच समोर आली असून महागाईने उच्चांक गाठल्याचे समजत आहे. महागाईच्या सरकारी आकडेवारीनुसार महागाई दर ७.३५ % वर पोहोचला आहे. भाज्यांचा दरात ६० % नी वाढ झाली आहे तर डाळी १५.४४% नी महागल्या आहेत. मांस आणि मासे ९ टक्क्यांनी महागले … Read more

कोल्हापूरकरांसाठी खूशखबर! मटणदरावर अखेर तोडगा

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मटण दरावर आज तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून मटण दर निश्चित करण्यात आले आहेत. कोल्हापूरात मांसाहार खाणार्‍यांची संख्या बहुसंख्य आहे. अशात मागील काही महिण्यांपासून कोल्हापूर येथे मटणाचे दर गगणाला भिडले होते. मात्र आज अखेर यावर तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून … Read more

डिसेंबरमध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर; एका महिन्यात झाली १.८१ टक्क्यांची वाढ

गेल्या डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये महागाईचा दर २.११ टक्के होता तर नोव्हेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के राहिला. मात्र गेल्या एका महिन्यात महागाई दारात १.८१ टक्के वाढ झाली असून वर्षाकाठी चलनवाढीचा दर सुमारे ५.२४ टक्क्यांनी वाढला आहे.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.

इराक-अमेरिका संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर; ३५० अंकांची घसरण

इराकने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला आहे. त्यामुळं इराक-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर सुद्धा पडताना दिसत आहेत. आज बुधवारी सकाळी आशियातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने बाजार उघडताच ३५० अंकांची घसरण झाली. सध्या तो १८० अंकांच्या घसरणीसह ४०६९० अंकांवर आहे.

अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने गाठणार ४५ हजाराचा टप्पा

अमेरिका आणि इराणमधील युध्दजन्य संकेतांमुळे सर्वात मोठा परिणाम शेअर बाजार आणि सोनेदरावर झाला आहे. युध्दाच्या भीतीने गुंतवणुकीची सुरक्षितता तपासली जाते आहे आणि साहजिकच सोने हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पहिली पसंती सोने खरेदीला दिली असल्याने आज ४१,००० पार करणारा सोनेदर यापुढेही चढता आलेखच ठेवणार असून तो ४५,००० पर्यंत पोहोचणार आहे.

देशभरातील २५ कोटी कर्मचाऱ्यांनी दिली उद्या भारत बंदची हाक

मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये २५ कोटी भारतीय सहभागी होतील असं समितीने सोमवारी स्पष्ट केलं आहे.

भारतीयांनी आता गुंडगिरी खपवून घेऊ नये – आनंद महिंद्रा

बुद्धीमंतांचा गढ समजल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांना क्रूर पद्धतीने मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. फी वाढ, नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयांवर वातावरण तापलेलं असताना आधी जामिया मिलिया आणि आता जेएनयूमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

कृष्णा बँकेकडुन शहिद कुटुंबियांना एक लाखाची मदत, अतुल भोसलेंकडून वीरपत्नीकडे मदत सुपूर्द

अतिरेक्यांशी लढताना शहिद झालेल्या संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना कराडच्या कृष्णा ट्रस्टकडून १ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

विनाअनुदानित LPG सिलिंडर 19 रुपयांनी महाग, विमानाच्या इंधन किंमतीतही वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे बुधवारी विमानाच्या इंधन (एटीएफ) च्या किंमतीत 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. विना अनुदानित एलपीजी सिलिंडरही 19 रुपयांनी महागला आहे. दराबाबत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीतील विमानाच्या इंधनाची किंमत प्रतिलिटर 1,637.25 रुपये म्हणजेच 2.6 टक्क्यांनी वाढून 64,323.76 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती वाढल्यामुळे सलग दुसर्‍या महिन्यात … Read more