खूशखबर! ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना मिळणार पेन्शन, उपराज्यपालांची घोषणा

दिल्ली | जेष्ठ नागरिक, विधवा महिला आणि अपंगांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू यांनी शनिवारी केंद्रशासित प्रदेशातील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग लोकांच्या पेन्शनच्या एक लाखाहून अधिक प्रकरणांना मंजुरी दिली आहे. केंद्रशासित प्रदेशातील प्रलंबित पेंशनच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी उपराज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाज कल्याण विभाग … Read more

पंचतारांकित हॉटेलने लावली शेखर रावजियानीच्या खिशाला कात्री

पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणं हे थोडं खर्चिक असतं हे सर्वाना माहित आहे. मात्र बाहेर वाजवी भावात मिळणाऱ्या गोष्टींच्या वाढीव बिल चुकविताना आता बॉलीवूड सेलेब्रेटींना घाम फुटत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोसने पंचतारांकित हॉटेलमध्ये बिलावरून आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांना २ केळ्यांचे बिल ४४२ रुपये आल्याचे त्याने सांगितले होते. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारी विशाल-शेखर यांमधील शेखर रवजियानी यांना देखील असाच एक अनुभव आला आहे. त्यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर टाकत माहिती दिली आहे.

कांद्या पाठोपाठ डाळीसुद्धा महागल्या,ओल्या दुष्काळाची झळ

परतीच्या पावसाचा कृषिमाल उत्पादनाला चांगलाच फटका बसला आहे. परिणामी बाजारात भाजीपाल्याची अवाक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वाढले असतांना आता डाळींच्या भावात सुद्धा वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह राज्यातील इतर भागात देखील किरकोळ बाजारांत ओल्या दुष्काळाच्या नावाने ग्राहकांची लूट सुरू असल्याचे समोर आले आहे.

अदानी समूह मुंबई विमानतळ सुद्धा विकत घेण्याच्या तयारीत?

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठी अदानी समूह १० हजार कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे समजते. तर उर्वरित ८ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार आहे.

इन्फोसिसचे काही मिनिटात बुडाले ४५ हजार कोटी

देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसच्या मॅनजमेंटवर सोमवारी गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळपर्यंत कंपनीच्या शेअर्स १४ टक्क्यांपेक्षा अधिक पडल्याचं पहायला मिळालं. यामुळे गुंतवणुकदारांचं अवघ्या काही मिनिटांमध्ये तब्बल ४५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झालं. शुक्रवारी इन्फोसिसचा शेअर ७६७.७५ रुपयांवर बंद झाला होता. तसंच कंपनीचं मार्केट कॅपही जवळपास ३ लाख ३० हजार ७३ कोटी रूपये होते. मंगळवारी कंपनीचे शेअर्स १६ टक्क्यांनी पडले असून ते ६४५.३५ रूपयांव पोहोचलं. त्यानंतर कंपनीची मार्केट कॅपही कमी होऊन ती २ लाख ७७ हजार ४५० कोटी रूपयांवर पोहोचली. दरम्यान, यामुळे गुंतवणुकदारांना तब्बल ५२ हजार कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं.

कमी मतदानामुळे प्रमुख उमेदवारांच्या चिंतेत वाढ !

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदार संघात पन्नास टक्यापेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन दिवसाच्या सुट्टीचा बेत, मतदानातील उदासीनता, नोकरदारांचे स्थलांतर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवरील संशय यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणूकीपेक्षा घसरली असल्याची चर्चा सुरू होती.

महाराष्ट्रातील बँकांकडून देशव्यापी बंदची हाक

महाराष्ट्रातील व्यापारी बँका मंगळवारी देखील बंदच राहणार आहेत. राज्यातील बँका सलग तिसऱ्या दिवशी बंद राहणार असल्याने खातेदार, ठेवीदार, ग्राहकांचे हाल कायम आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरण विरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारच्या, २२ ऑक्टोबर रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून व्यापारी बँकांच्या घसरत्या ठेवी दरांविरोधातही तीव्र मत प्रदर्शित केले जाणार आहे.

रेल्वे इतिहासात प्रवाशांना पहिल्यांदा मिळाली गाडीच्या विलंबापोटी भरपाई

दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसला १९ ऑक्टोबरला तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने आयआरसीटीसीला १.६२ लाखांचा भूर्दंड बसला आहे. रेल्वेची उपसंस्था असलेल्या आयआरसीटीसीला याप्रकरणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून ९५० प्रवाशांना भरपाई देण्यास सांगण्यात आले होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासात गाडीच्या विलंबापोटी प्रवाशांना भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘जिओ’ने बंद केले दोन स्वस्त डेटा पॅक

जिओ व्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रति मिनिट इंटरकनेक्ट युजेस चार्ज दर आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांना अजून एक दणका दिला आहे. कंपनीने १९ रुपये आणि ५२ रुपयांचे दोन स्वस्त प्रिपेड रिचार्ज पॅक बंद केलेत. अनुक्रमे एक दिवस आणि सात दिवस इतकी या दोन्ही पॅकची वैधता होती. हे पॅक बंद झाल्यामुळे आता ग्राहकांना किमान ९८ रुपयांचा कॉम्बो-पॅक रिचार्जसाठी उपलब्ध असणार आहे.

‘मारुती’ला बसला ‘टोयोटा’ सोबतच्या मैत्रीचा फटका !

देशातील ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये क्रॉस-बॅजिंग (भागीदारी अंतर्गत थोड्याफार बदलांसह एकाच प्रकारचे प्रोडक्ट निर्माण करणे) रणनितीला अद्याप यश मिळालेलं नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे टोयोटा ग्लांझा आणि आणि मारुती सुझुकी बलेनो या गाड्या. टोयोटा कंपनीने प्रीमियम हॅचबॅक प्रकारातील ‘ग्लांझा’कार लाँच केल्यापासून बलेनोच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. टोयोटा आणि सुझुकी यांच्यातील संयुक्त करारानुसार निर्मिती केलेली ग्लांझा ही पहिलीच कार आहे.