बुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान

लडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध पिकांची नासाडी झाली आहे.

राज्यावर कर्जाचा डोंगर; युती सरकारच्या काळात २.९१ लाख कोटींची भर

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे धुमशान सुरु आहे. मागील पाच वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेकडून राज्यामध्ये कोणकोणती विकास कामे केली याचा दाखला दिला जात आहे,तर विकासकामांच्या नावाखाली सरकारने धूळफेक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आज दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीचा प्रसार सुरु होणार आहे. मात्र त्या आधीच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.

आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे.

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात कळवण येथील शेतकरी आक्रमक

नाशिक प्रतिनिधी। केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असुन निर्यातबंदी तत्काळ हटवावी या मागणीसाठी सतंप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज कळवण येथे रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. सध्या कांद्याला चांगला भाव असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात सोमवारी सकाळी … Read more

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

माझ्यामुळे पवार साहेबांचं नाव खराब होत असेल तर मी राजकारण सोडणंच चांगलं – अजित पवार

अजित पवार यांचा राजीनामा आणि ईडी चौकशी यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान मोदींनी दिल्या मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचा आज ८७ वा वाढदिवस. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या मनमोहन सिंग यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखलं जातं. वाढदिवसानिमित्त देशभरातून मनमोहन सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्रीच ट्विटरवरून डॉ मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्याला उत्तम … Read more

पीएमसी बँकला कायमचे टाळे लागणार?

मुंबई प्रतिनिधी। पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) बँक आर्थिक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह या आदेशनानंतर बँकेला कायमचे टाळे लागण्याची परिस्थिती वेळ आली आहे. बँक आर्थिक डबघाईला आल्यामुळेच आरबीआयने हा निर्णय घेतला असून, या निर्णयाने खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. … Read more