नवी दिल्ली । एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मधून तुमचे PF चे पैसे काढल्यावर तुम्हाला अनेक वेळा टॅक्स भरावा लागतो. त्यात केलेली गुंतवणूक टॅक्स फ्री असली तरी नियमांचे पालन न करता पैसे काढल्यावर TDS (Tax Deduction at Source) आकारला जातो.
सामान्यतः PF खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत पैसे काढल्यास TDS कापला जातो, मात्र याशिवाय अनेक प्रसंग असे येतात जेव्हा तुम्हाला TDS भरावा लागतो. तर कोणत्या परिस्थितीत तुम्हांला TDS कपात टाळता येईल आणि कधी टॅक्स भरावा लागेल हे जाणून घ्या.
‘या’ परिस्थितीत TDS कापला जाणार नाही
एका PF खात्यातून दुसऱ्या PF खात्यात रक्कम ट्रान्सफर केल्यावर.
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, आजारपणामुळे सर्व्हिस समाप्त करणे किंवा कंपनी सोडल्यानंतर पैसे काढल्यावर.
खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी पैसे काढल्यावर.
पीएफ खात्यातून 50 हजारांपेक्षा कमी रक्कम भरल्यास.
पॅनसह फॉर्म 15G/15H सबमिट करून पैसे काढल्यावरही TDS कापला जाणार नाही.
येथे तुम्हाला टॅक्स भरावा लागेल
खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत 50 हजार किंवा त्याहून जास्त रक्कम काढल्यास 10% TDS कापला जाईल.
पीएफ काढण्याच्या वेळी पॅन न दिल्यास 34.60 टक्के दराने TDS कापला जाईल.
फॉर्म 15G/15H दिल्यावरही, वार्षिक 2.5 लाखांपेक्षा जास्त कमाई केल्यास, जर पैसे काढणे 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाऊ शकतो.