महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याबरोबर अजय देडे नावाच्या व्यक्तीवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 32 वर्षीय महिलेने पुण्याच्या येरवाडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणी करुणा शर्मांविरोधात (Karuna Sharma) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
आरोपी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पीडितेस हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा यासाठी करुणा शर्मां यांनी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तर पीडितेचा पती अजय कुमार विष्णू देडे याने पीडित महिलेला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी करुणा शर्मावर (Karuna Sharma) भा द वि कलम 498 (अ), 377, 323, 504, 506 (2), 34 अनुसुचित जाती व जमाती अत्याचारास प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(R)(S) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

करुणा शर्मा कोण आहे?
करुणा शर्मा (Karuna Sharma) या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी आहेत. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनीदेखील गेल्यावर्षी फेसबुक पोस्ट टाकून आपण करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं कबूल केलं होतं. तसेच त्यातून आपल्याला दोन अपत्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राजकारणात आणि राज्यात मोठी खळबळ उडाली होती. करुणा शर्माची (Karuna Sharma) बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली बाजू मांडली होती. या सर्व प्रकारामुळे करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या.

हे पण वाचा :
घसरत्या बाजाराची येत्या आठवड्यात वाटचाल कशी राहील ???

नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड

Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले

भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर

आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे कर्मचाऱ्याने केले ‘हे’ कौतुकास्पद काम

Leave a Comment