किरकोळ कारणातून रिक्षावाल्याने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार काही सामान्य माणसासोबत नाही तर एका पोलिसासोबत घडला आहे. यामध्ये एका रिक्षाचालकाने भाडे नाकारल्याने पोलीस आणि रिक्षाचालकामध्ये बाचाबाची झाली. यानंतर त्या रिक्षाचालकाने रागाच्या भरामध्ये थेट पोलिसाच्या कानाखाली वाजवली (Rickshaw driver beats police). कायद्याचे रक्षक असणारे पोलीस यांच्या बरोबरच असा प्रकार घडत असेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके ?
वाशी रेल्वे स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याला एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी वाशी येथील मनपा रुग्णालयात घेऊन जायचे होते. त्यासाठी त्यांनी स्टेशनजवळ असलेल्या एका रिक्षाचालकाला विचारणा केली. मात्र रिक्षाचालकाने भाडे नाकारल्याने पोलीस आणि रिक्षाचालकामध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान राग अनावर झाल्याने रिक्षाचालकाने पोलिसाच्या कानाखाली दिली (Rickshaw driver beats police) तसेच रिक्षाचालकाच्या साथीदाराकडून पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर वाशी पोलीस स्टेशनमध्ये कलम 353, 332, 323, 504, 506 अंतर्गत रिक्षाचालकावर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली आहे.

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ
पोलिसांवर हल्ला झाल्याची ही घटना काही पहिलीच घटना नाही. या अगोदरदेखील अनेक ठिकाणी रिक्षाचालकांची मुजोरी समोर आली आहे. रिक्षा चालकांकडून अनेकवेळा सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो. मात्र, आता थेट वर्दीवरच हात उचलल्याने (Rickshaw driver beats police) मुजोर रिक्षावाल्यांचा बंदोबस्त होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
घसरत्या बाजाराची येत्या आठवड्यात वाटचाल कशी राहील ???

नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड

Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले

भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर

आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे कर्मचाऱ्याने केले ‘हे’ कौतुकास्पद काम

Leave a Comment