मुंबई | मागील २ महिन्यांहून अधिक काळ चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तपासात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत असून आजही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. सुशांतची प्रेयसी रियाला ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCB ने रिया विरुद्ध FIR दाखल केला आहे.
त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. सीबीआय, ईडी आणि Narcotics Control Bureau, NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा NCB चे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे.
Narcotics Control Bureau registers a case against Rhea Chakraborty and others in #SushantSinghRajput's death https://t.co/oNs6L0KEnE
— ANI (@ANI) August 26, 2020
त्यानंतर रिया विरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीने NCBला पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही अस्थाना यांनी दिली आहे. यामुळे आता NCB ही त्या अँगलने तपास करणार आहे. यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.