परभणी ब्रेकिंग | गजानन घुंबरे
राज्यात कोरोनाव्हायरस संसर्ग ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात लॉकडाउन मधून सवलत देण्याचा विचार चालू असतानाच रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्याहून आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला लक्षणे आढळल्याने त्याचे विलगीकरण करत, स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. संबंधित युवकाला आता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी आणि तपासणी सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान लॉक डाउनपासून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या चांगल्या बंदोबस्तामुळे कोरोना संसर्गाचाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नव्हता. त्यामुळे सामान्य जनतेसह प्रशासन निश्चिंत होते परंतु आता नागरिकांसह प्रशासनाला चांगले सतर्क व्हावे लागणार आहे.