भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचा पहिला फोटो, देशातील पहिल्या रुग्णांकडून घेतला होता नमुना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)मधील  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी प्रथमच कोरोना व्हायरसची छायाचित्रे उघड केली आहेत. ही छायाचित्रे ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इमेजिंगच्या सहाय्याने घेण्यात आली आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयजेएमआर) च्या नवीनतम आवृत्तीत या कोरोनाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर कोरोना व्हायरसचे छायाचित्र भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या गळ्यातून घेतलेल्या नमुन्याचे आहे.

केरळमध्ये ३० जानेवारी २०२० रोजी देशातील विषाणूच्या संसर्गाची पहिली नोंद झाली होती. चीनमधील वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या केरळमधील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. केरळमधील या नमुन्यांचे जनुक अनुक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे करण्यात आले. चीनमधील वुहान शहरात आढळणारा हा विषाणू भारतात आढळलेल्या विषाणूशी ९९.९८ टक्के जुळत असल्याचे आढळून आले.

आयजेएमआर मधील वरील लेख आयसीएमआर-एनआयव्ही नॅशनल इन्फ्लूएंझा सेंटरच्या टीमने लिहिले आहे. त्याच्या लेखकांमध्ये एनआयव्हीचे उपसंचालक आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि पॅथॉलॉजीचे प्रमुख अतानू बासु देखील आहेत. लेखानुसार, एक व्हायरस पार्टिकल खूप चांगल्या प्रकारे जतन करण्यात आला आहे. ज्यात कोरोना कोरोनाची विशिष्ट लक्षणे दिसून येत होती. या व्हायरसचा आकार ७५ नॅनोमीटर इतका आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गावर अजून इलाज सापडलेला नाही. जगातील अनेक देशांतील शास्त्रज्ञ या व्हायरसवर उपचार शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच अमेरिकेने लसीची चाचणी केली असून त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. भारतीय शास्त्रज्ञांनी या व्हायरसची माइक्रोस्‍कोपी इमेज काढल्यामुळं. त्याच्या उपचारांविषयीच्या पुढील अभ्यासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या व्हायरसपासून साथीचा रोग कसा पसरत आहे याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. कोरोना व्हायरसची उत्पत्ती नैसर्गिक आहे कि, मानवनिर्मित आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ धडपड सुरू आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment