इंदापूर प्रतिनिधी | राज्यात लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे.मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली तरच लोकसभा निवडणुकीत आघाडीची काम करू अन्यथा आघाडीचे काम करणार नसल्याचा पवित्रा इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र ‘आधी लोकसभा जिंकायची आहे, विधानसभेबाबत नंतर चर्चा करू’ असे बोलून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना गप्प केले. त्यामुळे इंदापूर विधानसभेच्या जागेचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
आम्ही दर वेळी आघाडीची कामे करतो मात्र लोकसभेनंतर विधानसभेवेळी आमचा घात केला जातो, असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी इंदापूर विधानसभेच्या जागेच्या निर्णय करण्याची मागणी केली आहे. मात्र आत्ता लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु विधानसभेबाबत नंतर चर्चा करू असे अजित पवारांनी सांगितले. त्यामुळे इंदापूर विधानसभेच्या जागेचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाचे –
‘या’ मतदार संघातून प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढणार
विकासकामांचा निधी पळवल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन…