विक्की कौशलच्या ‘अश्वत्थामा’ या चित्रपटाचा First Look रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 2018 मध्ये, आदित्य धर दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित ‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने सर्वांना चकित होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, ज्यात विकी कौशलला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला, तर दिग्दर्शक आदित्य धर यांनीही दिग्दर्शनासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला. या चित्रपटाने आज दोन वर्षे पूर्ण केली. याचेच औचित्य साधून विकी, आदित्य आणि रॉनी या तिघांनीही आपल्या जॉईंट व्हेंचरच्या पुढील चित्रपट ‘अश्वत्थामा’ याचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे, जो एक फिक्शनल चित्रपट आहे आणि जो महाभारतातील एका अध्यायातील एका पात्रावर आधारित आहे.

यावेळी आदित्य म्हणाले की, ‘गेल्या दोन वर्षात उरीला मिळालेल्या प्रेमामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत. त्या प्रेमासाठी चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याची अतिरिक्त जबाबदारी नक्कीच आपल्यावर येते. ‘अश्वत्थामा’ या चित्रपटामध्ये आम्ही एक शानदार व्हिज्युअल समोर आणणार आहोत. भारतभरातील प्रेक्षकांसाठी यापूर्वी कधीही न पाहिलेला असा नेत्रदीपक व्हिज्युअल सादर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझी खात्री आहे की, हा फक्त एक चित्रपटच नाही तर एक सर्वांसाठी एक अप्रतिम असा अनुभव असेल. दडपणापेक्षा हा चित्रपट एक महाकथा म्हणून सांगण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. मला आशा आहे की, प्रेक्षक ‘अश्वत्थामा’ लाही त्याच प्रकारे प्रेम देतील ज्या प्रकारे त्यांनी उरीवर प्रेमाचा वर्षाव केला.

त्याचवेळी रॉनी स्क्रूवाला म्हणाले की, ‘प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा प्रवास असतो, या चित्रपटासाठी भाषा ही अडथळा नाही. आम्ही यावर्षी शूटिंग सुरू करू. तसेच आदित्यच्या दूरदृष्टीला पडद्यावर पाहण्याची मी वाट पाहू शकत नाही. मला हे सांगायला आवडेल की, मी आत्तापर्यंत प्रयत्न केलेला हा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट आहे आणि आम्हाला तो भारत आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास आवडेल.

https://t.co/gehmb5ARNx?amp=1

विकी कौशलने ‘अश्वत्थामा’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट असल्याचे सांगितले आहे. तसेच आदित्य आणि रॉनीबरोबर पुन्हा काम करणे त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. विक्की म्हणाला, ‘अश्वत्थामा’ हा आदित्यचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि प्रेक्षकांसमोर तो सादर करण्यासाठी रॉनीसारख्या दूरदर्शीपणाची गरज होती. अभिनेता म्हणून माझ्यासाठी ही नवीन जागा असेल, जिथे मी अभिनय तसेच तंत्रज्ञानाच्या शोधात आहे.’

https://t.co/Q4WaCEYcII?amp=1

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.