नागपूरमध्ये चंदनाची झाडे चोरणारी टोळी जेरबंद,आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी चंदनाची झाडे चोरणाऱ्या (stealing sandalwood trees) काटोलच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. नागपूर शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणावरून चंदनाची चोरी (stealing sandalwood trees) केल्याचे या आरोपींनी कबुल केले आहे. त्यांनी चोरी केलेल्या ठिकाणांमध्ये सरकारी निवासस्थानांचा सुद्धा समावेश आहे. या चोरांचे कनेक्शन उत्तर प्रदेशपर्यंत जोडले असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात आरोपींनी आणखी कुठे कुठे यांनी चंदनाची चोरी (stealing sandalwood trees) केली आणि यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

या चोरट्यांचे उत्तर प्रदेशमधील टोळीसोबत कनेक्शन
गेल्या काही काळामध्ये नागपुरात चंदनाच्या झाडांची चोरी (stealing sandalwood trees) होत असल्याचं समोर आलं. त्यामध्ये राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनातील चंदनाच्या झाडाची सुद्धा चोरी झाली होती. त्याचप्रमाणे अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यांमध्ये असलेले चंदनाच्या झाडांची चोरी (stealing sandalwood trees) झाल्याच्या घटना घडल्या. नागपूर शहरात जवळपास सहा घटना घडल्याने याचा तपास गुन्हे शाखा पोलिसांनी आपल्याकडे घेतला आणि या प्रकरणाची चौकशी सुरु केली.

यानंतर पोलिसांना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एकाचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सहा ठिकाणी केलेल्या चोरीची (stealing sandalwood trees) कबुली दिली. मात्र हे चंदन कुठे जात होतं याचा शोध घेत असताना पोलिसांना या चोरट्यांचे कनेक्शन उत्तर प्रदेशमधील कान्होज येथील टोळीसोबत असल्याचे उघडकीस आले. आता पोलीस हे चंदन विकत घेणाऱ्या शमीम पठाणचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment