परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने जिल्हातील दोन गावांमध्ये असणाऱ्या जिवंत कोंबड्या मारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता . यासंदर्भात आज कारवाई करत मुरुंबा आणि देवठाणा गावातील सुमारे ५५५० जिवंत कोंबड्या मारत त्यांना खड्यांमध्ये पुरण्यात टाकण्यात आले आहे .
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावांमध्ये सात व आठ जानेवारी रोजी बर्ड फ्लू आजाराने 900 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला होता .याप्रकरणी प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते .हा आजार जिल्ह्यात इतर ठिकाणी पसरू नये म्हणून या गावातील सर्व कोंबड्या मारून टाकण्याचा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला होता .सोमवारी मुरुंबा व देवठाणा या दोन गावातील कोंबड्या पुरण्यासाठी प्रशासनाने जेसीबी यंत्राने खड्डे खोदून ठेवले होते .आज सकाळी जिवंत कोंबड्या मारण्याचे काम सुरू करण्यात येत त्यांना पुरण्यात आले आहे .
अशी माहिती उपजिल्हाधीकारी संजय कुंडेटकर यांनी दिली आहे .ते असेही म्हणाले की नागरिकांनी यासंदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही पुरवण्यात आलेल्या सर्व कोंबड्या पानवठ्या सारखा ठिकाणापासून दूर पुरले असल्याने त्याचा संसर्ग होणार नाही .तशी खबरदारी घेण्यात आली आहे .जिल्ह्यात आणखी बर्ड फ्लू चे प्रकरणे आढळल्यास प्रशासन योग्य ती कारवाई करेल असेही त्यांनी आश्वस्त केले .
दरम्यान कुकूटपालन केल्यानंतर कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या ३० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोग्य विभाग त्यांच्यावर देखरेख करत आहे .
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.